Home / कलाकार / परदेशी वरातीत भारतीय गाण्यावर नाचले फॉरेनर

परदेशी वरातीत भारतीय गाण्यावर नाचले फॉरेनर

जगात अनेक निरनिराळ्या व्यक्ती राहतात आणि त्यानुसार बऱ्याच जातीजमाती सुद्धा आहेत. प्रत्येकाच्या रूढी परंपरा वेगळ्या वेगळ्या असतात. प्रदेश बदलला की त्यानुसार तिथल्या चालीरीती आणि संस्कृती बदलते. आपली भारतीय संस्कृती ही जगाला प्रिय आहे आणि हे तुम्ही अनेकदा ऐकले किंवा पाहिले असेल. जर कोणी भारताचे कौतुक करत असेल तर आपल्याला आनंद हा होतोच.

परंतु ज्यावेळी परदेशात भारतात केल्या जाणाऱ्या गोष्टी फॉलो केल्या जातात तेव्हा भारतीय परंपरांचा खूप गर्व वाटतो. असाच एक मस्त व्हिडिओ तुमच्या मनोरंजनासाठी घेऊन आलो आहे. आपल्याकडे लग्नाच्यावेळी नवऱ्या मुलाची वाजतगाजत वरात निघते आणि बरेच पाहुणे तसेच मित्रमंडळी डान्स सुद्धा करतात.

असाच एका नवऱ्या मुलाच्या वरातीचा हा व्हिडिओ आहे परंतु इथे वेगळी गोष्ट म्हणजे ही भारतातील वरात नसून परदेशातील वरात आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हीही भारतासारखी परदेशातील वरात बघून खूप आनंदी व्हाल. वरातीत सामील झालेल्या व्यक्तींनी भारतीय पध्दतीप्रमाणे साड्या सुद्धा घातल्या आहेत तसेच काही जणांनी शेरवानी सुद्धा.

नवरा मुलगा हा घोड्यावर बसवला आहे. तसेच यांबरोबर एक डॉल्बी वाला आहे जो त्यांना गाण्यांवर कसा ठेका धरायचा हे सांगत आहे. आता तुम्हाला परदेशातील वरात म्हणजे गाणीसुद्धा इंग्लिश वाजवली असतील असे वाटत असेल परंतु असे नाही. या वरातीत भारताप्रमाणेच हिंदी गाण्यांवर डान्स केला जात आहे.

‘सुबह होने ना दे’ तसेच ‘छम्मक छल्लो’ अशा अनेक गाण्यांवर परदेशींनी ठेके धरले. हे सर्व करताना ते खूप आनंदी दिसत आहेत. तुम्हालाही हा व्हिडीओ कसा वाटला? तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.

पहा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.