सध्या अनेक रिऍलिटी शोमुळे आपली करमणूक होते मग त्यामध्ये गायन, डान्स, कॉमेडी अश्या अनेक रिऍलिटी शोजचा समावेश आहे. याबरोबरच बऱ्याच ठिकाणी रोडशो सुद्धा केले जातात आणि त्यामध्ये अनेक प्रकारची नाटके आणि डान्स केला जातो. असाच एक कार्यक्रम परदेशात आयोजित केला गेला होता जिथे आपल्या भारतीय मुलींनी डान्स करून आपल्या देशाची मान उंच केली आहे.
या कार्यक्रमात जो डान्स प्रकार केला गेला तो म्हणजे महाराष्ट्राचा प्रसिद्ध नृत्य प्रकार म्हणजेच लावणी. या लावणीच्या तालावर आजवर बरेचजण नाचले आहेत. सुंदर असा साजेसा मराठमोळा लूक आणि लावणीच्या गाण्यातील तो ठसका हे या नृत्य प्रकारचे वैशिष्ट्य आहे. या व्हिडिओमध्येही अशीच उत्तम प्रकारे लावणी सादर केली आहे पण ती महाराष्ट्रातील जनतेसमोर नाही तर परदेशातील लोकांसमोर.
खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्राचा एक नृत्य प्रकार हा परदेशात केला जातो. या व्हिडिओत लावणी सादर करणाऱ्या पाचही मुलींनी ती अगदी उत्तम प्रकारे निभावली आहे. ‘रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी’, ‘चैत्र पुनवेची रात’ अश्या लावण्यांवर त्यांनी ठेका धरला. प्रेक्षकांनीही त्यांना बराच चांगला प्रतिसाद दिला. तुम्हालाही ही परदेशातील लावणी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा.
पहा व्हिडीओ: