Breaking News
Home / कलाकार / नेहा कक्कर दुसऱ्यांदा लग्न करू इच्छिते कारण त्याने

नेहा कक्कर दुसऱ्यांदा लग्न करू इच्छिते कारण त्याने

नुकतंच नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग या दोघांचे लग्न झाले आणि तेव्हापासून ते नेहमीच चर्चेत आहेत. बऱ्याच जणांना असे वाटत होते की, दोघांचे लग्न हे त्यांच्या नवीन येणाऱ्या कामाचा हिस्सा असू शकते. नेहा कक्कड सध्या इंडियन आयडल सीझन १२ च्या रियालिटी शोची जज आहे. नुकतंच नेहाने एकदा खुलासा केला की, तिला अजून एकदा लग्न करायचे आहे. तुम्ही याबाबतीत काहीतरी गैरसमज करून घेण्याआधी नेहा कक्कर नक्की काय बोलली हे जाणून घेऊया.

नेहाने रोहनप्रीत बरोबर हिंदू रितिरिवाजाने लग्न केले आणि ती त्यावेळी खूप सुंदरही दिसत होती. नेहाने सांगितले आहे की, नेहाला आता हिंदू रीतिरिवाजनंतर ईसाई धर्मानुसार लग्न करायचे आहे. इंडियन आयडलच्या एका एपिसोडसाठी नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनाही लग्नसोहळा विशेष भागात बोलवले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांना खूप सुंदर असे पांढरे कपडे घालून लग्न करायचे आहे.

नेहाने सांगितले की, ‘मी पांढरे कपडे घालून अजून एकदा लग्न करू इच्छिते. मी हिंदु रीतिरिवाजांप्रमाणे लग्न केले आहे आणि त्यावेळी मी पारंपरिक कपडे घातले होते. मग आपण यावेळी ईसाई धर्मांच्या रीतिरिवाजांचे पालन करून लग्न करू शकतो?’ नेहाने हे पण सांगितले की, तिच्या लग्नाचे कपडे डिझायनर अनिता डोंगरेने बनवले होते. नुकतंच काही दिवसांपूर्वी नेहाने सांगितले होतं की रोहनप्रीतने नशेत असताना नेहाला प्रपोज केले होते.

रोहनप्रीतने प्रपोज करताना असे बोलले की,’मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत, आपण लग्न करूयात.’ नेहाने हसत हसत सांगितले की,’यांनी दोन तीन बिअर पिल्या होत्या तर मला वाटले की हा नशेत बोलत आहे. सकाळी हा विसरून जाईल.’ त्याच्या पुढच्या दिवशी नेहा चंदीगडला शूटिंग साठी गेली होती. तेव्हा रोहनप्रीत तिकडे नेहाला भेटायला गेला. त्यावेळी त्याने बोलले की,’कालचे बोलणे लक्षात आहे ना?’ त्यावर नेहा बोलली की, ‘तुम्ही पिली होती, मला का नाही लक्षात राहणार ती गोष्ट.’ यानंतर नेहाची आई रोहनप्रीतला भेटली आणि त्याची चाहती झाली.

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *