Home / कलाकार / नेहा कक्कर ची बहीण पहा कशी दिसते

नेहा कक्कर ची बहीण पहा कशी दिसते

नेहा कक्कड, सोनू कक्कड आणि टोनी कक्कड हे बॉलीवूडमधले लोकप्रिय गायक आहेत. हे तिघेही लहानपणी त्यांच्या वडिलांबरोबर भजन गात असायचे आणि आज त्यांनी खूप मोठी सफलता मिळवली आहे. या तिघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि नेहमी ते तिघेही मिळून राहतात. एक भाऊ आणि दोन बहिणी यांनी पूर्ण बॉलीवूडमध्ये त्यांचे नाव केले आहे.

ज्याला ज्याला पाहतो तो यांची गाणी म्हणत किंवा ऐकत असतो. तिघांनीही एकावेळीच त्यांचे हे गाण्याचे काम चालू केले होते आणि आज तिघेही पूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. नेहा तिच्या भावाबरोबर तसेच बहिणीबरोबर अतिशय आनंदाचे आणि नेहमी लक्ष्यात राहतील असे क्षण व्यतीत करत आहे. जेव्हा कधीही हे तिघे एकत्र कोणत्या कार्यक्रमात येतात तेव्हा मंचावर आणि पूर्ण कार्यक्रमात फक्त ते आणि त्यांची गाणी याचे वातावरण असते.

कधी त्यांच्या लहानपणीचे फोटो पाहून आनंदाने उत्साही झाले तर कधी डान्स आणि गाणे यामुळे चांगला वेळ घालवताना ते नेहमी दिसले आहेत. नेहाच्या हाऊस वार्मिंग पार्टीमध्ये तिघांची मस्ती आणि भावनिक क्षण दिसून आले. नेहाची खोड ही कधी टोनी तर कधी तिची बहीण सोनू करताना दिसली आणि सगळ्यात मजेदार म्हणजे जेव्हा टोनी आणि नेहा मिळून मजेशीर व्हिडीओ बनवत असतात.

असे बरेच व्हिडिओ तुम्ही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर पाहिले असतील. त्यांच्यातील हे प्रेम आणि मस्ती पाहून आपल्या चेहऱ्यावर हसू येते. त्यांचे हे नाते पाहून आपणही आपल्या भावाबरोबर आणि बहिणीबरोबर असे आठवणीत राहणारे क्षण व्यतीत करावे असे वाटेल.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *