Breaking News
Home / कलाकार / निलेश साबळे ची पत्नी आहे हि सुंदरी पाहून वेडे व्हाल

निलेश साबळे ची पत्नी आहे हि सुंदरी पाहून वेडे व्हाल

काय मंडळी हसताय ना? हसायलाच पाहिजे असं म्हणणारा आणि संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा कॉमेडी शोमधला एक आगळावेगळा कलाकार ज्याचे नाव आहे निलेश साबळे. निलेश यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा व्यक्तीबद्दल म्हणजेच त्याच्या पत्नीबद्दल आणि निलेश यांच्यात प्रेम कसे कुठे जुळले हे जाणून घेणार आहोत. गौरी आणि निलेश यांची पहिली भेट स्पंदन युथ फेस्टिव्हल येथे झाली.

गौरी या तिथे गायन स्पर्धेसाठी गेल्या होत्या तर निलेश नेहमीप्रमाणेच अभिनय स्पर्धेसाठी गेले होते. निलेश हे शाळेतही प्रत्येक गोष्टीत हुशार होते. अभ्यास, गायन, अभिनय इत्यादी मध्ये त्यांचा हात कोणी नव्हतं धरू शकत. त्यामुळे त्यांनी कधीही शाळेत असताना पहिला क्रमांक सोडला नाही. त्या फेस्टिव्हलमध्ये सुद्धा अभिनयामध्ये निलेशने पहिला क्रमांक पटकावला.

काही वेळानंतर गायन स्पर्धेची सुरुवात झाली आणि त्यावेळी गौरीचा परफॉर्मन्स होता. निलेश आणि त्यांचे मित्र ते पाहण्यासाठी बसले होते. परंतु यांनी असे ठरवले होते की गौरी यांना गाऊ द्यायचे नाही आणि गोंधळ करू लागले. परफॉर्मन्स चालू व्हायच्या आधीच या मुलांनी टाळ्या शिट्ट्या वाजवायला चालू केले. गौरीने या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तिचे गाणे चालू ठेवले.

नंतर निलेश यांना वाटले की मुलगी चांगली गातेय त्यामुळे आपण गोंधळ करणे थांबवावे आणि तिला गाऊ द्यावे. निलेशना तिचे गाणे खूप आवडले. एका सिनियरने त्या दोघांची ओळख करून दिली आणि ते दोघे एकमेकांना बोलू लागले. परंतु काही कारणामुळे दोघांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जावे लागेल. काही दिवसांनी निलेश यांना गौरी ज्या कॉलेजमध्ये आहे तिथे कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले.

निलेशही यामुळे खुश झाले की आता गौरीला भेटायला मिळेन. संपूर्ण कार्यक्रम झाला तरी निलेशला गौरी कुठे दिसली नाही. जायच्या वेळी त्यांना गौरीने हाक मारली आणि बोलता बोलता मोबाईल नंबर एकमेकांना दिले गेले. निलेश यांना गौरी आवडू लागली होती, ती आपल्या आयुष्यात आपली पत्नी बनावी हे त्यांना वाटत होते. परंतु चांगली चाललेली मैत्री नंतर तुटेल या भीतीने निलेशने कधी गौरीला प्रपोज नाही केले.

गौरी एकदा निलेशला बोलली की तिच्या मैत्रिणी म्हणतात की निलेश तुला खूप पसंत करतात पण तू कधी काहीच का नाही बोलत. तू बोलतोस का मी बोलू. याप्रकारे त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम समजून आले. बिना काही बोलताच त्यांचे प्रेम व्यक्त झाले. राहिला प्रश्न आता घरच्यांचा, त्यांना कसे विचारायचे आणि पटवायचे. एका कार्यक्रमात गौरी निलेश आणि त्यांच्या घरचेही होते, त्यावेळी त्यांच्या घरच्यांची ओळख झाली होती.

नंतर त्यांच्या घरच्यांनाही समजू लागले की या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. दोघेही त्यावेळी मेडिकलमध्ये डॉक्टरकीचे शिक्षण घेत होते. आधीच बोलताना निलेशने गौरीला सांगितले होते की मी डॉक्टरची प्रॅक्टिस न करता अभिनय करणार आहे. निलेशचा अभिनय पाहून झी मराठीने त्यांना चला हवा येऊ द्या या कार्यक्रमासाठी निवडले. आपण आजही पाहतो की हा कार्यक्रम देशात आणि देशबाहेरसुद्धा किती प्रसिद्ध आहे. निलेश यांच्या यशामागे गौरीचा खूप पाठिंबा होता.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *