नागराज मंजुळेंच्या बायकोला घर चालवण्यासाठी हे काम करावं लागत आहे

मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्ड ब्रेक अशी १०० कोटींची कमाई करणारा चित्रपट म्हणजे ‘सैराट’. सैराट या चित्रपटाने दर्शकांना जणू याडंच लावलं होत. या चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत. त्यांचे नाव आहे नागराज मंजुळे. नागराज यांचीच ‘पिस्तुल्या’ ही शॉर्टफिल्म आणि ‘फँड्री’ हा चित्रपट यांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून नागराजची ओळख बनली आहे. नागराज यांनी त्याच्या प्रत्येक चित्रपटात गावाची अस्सल भाषा जशीच्या तशी प्रेक्षकांसमोर सादर केली आणि त्याचे फळ त्यांना भेटले.

पण ही झाली त्यांच्या प्रोफेशनल जीवनाची माहिती. कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येकाला त्यांच्या वैयक्तिक जीवनाची माहिती जाणून घ्यायची उत्सुकता आहे. चला तर मग पाहूया नागराज मंजुळे यांच्या आयुष्यातील वैवाहिक जीवनातील थोडक्यात माहिती. त्यांचे लग्न १७ मे १९९७ साली नागराज यांचे सुनीता बरोबर लग्न झाले. अत्यंत सध्या पद्धतीने त्यांचे लग्न केले गेले. त्यांच्या विवाहाचे सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळतील. म्हणतात ना फोटोत आपण आपल्या भावना नाही सांगू शकत त्या जगतानाच कळतात.

या फोटोंमध्ये जरी ते सुखी दिसत असले तरी त्यांच्या जीवनात काही वेगळंच घडलं. त्यांचा हा संसार जास्त काळ टिकला नाही. त्यांच्या या संसारात बरीच भांडण झाली ज्यामुळे त्यांना एकमेकांपासून वेगळे व्हावे लागले. २०१४ साली त्यांनी घटस्फोट घेतला आणि दोघेही वेगळे झाले. सुनीता या तेव्हापासून पुण्यातील चिंचवड भागातील रामनगर परिसरात राहतात. पोटगीला जेवढे पैसे मिळाले त्याचा वापर करून त्यांनी आपले जीवन जगायला चालू केले. पण ते पैसे तरी किती दिवस टिकणार. पैसा आहे खर्च तर होणारच आणि संपणार.

पैशांची टंचाई भासू लागल्याने त्यांनी दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करायला चालू केले. प्रत्येक बायको ही प्रत्येक बऱ्यावाईट परिस्थितीत साथ देते, घरी गरिबी असूनही सगळे सांभाळून घेते परंतु दोघांचे विचार जर पटत नसतील तर ते नाते टिकू नाही शकत. अवघ्या दोनच आठवड्यात ४० कोटींच्या वर कमाई झालेल्या सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक आज एवढे मोठे झाले आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची दाद नाही. प्रेक्षकांना खेडवळ भाषाच आवडेल हा त्यांना पूर्ण विश्वास होता. त्यांनी बऱ्याच वाईट परिस्थितीना सामोरे जात हे नाव कमावले आहे. आज नागराज हे बऱ्याच लोकांचे आदर्श आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *