Home / कलाकार / दिव्या भारती ची बहीण होत असून नाही मिळत काम, असं जीवन जगात आहे

दिव्या भारती ची बहीण होत असून नाही मिळत काम, असं जीवन जगात आहे

बॉलीवूड मध्ये खूप सारे अभिनेता अभिनेत्री येतात आणि दोन-तीन चित्रपट करून फ्लॉप झाले तर ते परत चित्रपट करत नाहीत. काही कलाकार असेही आहेत जे त्यांच्या अभिनयामुळे ओळखले जातात. त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी चांगले नाव कमावले आहे आणि एक यशस्वी कलाकार म्हणून जीवन व्यतीत करत आहेत.

आज इथे आपण त्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहे जिला सध्या काम मिळत नाही. इथे आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारतीच्या चुलत बहिणीबद्दल बोलत आहोत. ९० च्या दशकात सुपरहिट झालेल्या अभिनेत्री दिव्या भारतीचे खूप फॅन आहेत. ‘दिवाना’ चित्रपटानंतर दिव्याचे खूप चाहते बनले. परंतु त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे बऱ्याच चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आले.

परंतु इथे आपण तिच्या बहिणीबद्दल बोलणार आहोत जिचे नाव कायनात अरोडा आहे. कायनात अरोडा दिसायला तिच्या बहिणीसारखी म्हणजेच दिव्या भारतीसारखी अतिशय सुंदर आहे. ती सध्या ३२ वर्षांची आहे. तरीही कोणत्या अभिनेत्रीपेक्षा ती कमी नाहीये. कायनात पंजाबी चित्रपटात काम करते. तामिळमधल्या चित्रपट ‘मनकथा’ मध्ये सुद्धा कायनातला आपण पाहिले असेल.

तिला १०० करोडच्या एका क्लबमधल्या असलेल्या ‘ग्रँड मस्ती’ चित्रपटात सुद्धा पाहिले असेल. त्या चित्रपटात तिचे नाव मारलो होते. हा संपूर्ण चित्रपट डबल मीनिंगवर आधारित होता. अक्षय कुमारच्या ‘खट्टा मीठा’ या चित्रपटातील एक आयटम सॉंग आईला रे आईला यातसुद्धा तिने काम केले आहे.

कायनातने मलयालम, तेलुगू आणि पंजाबी चित्रपटात काम केले आहे. मलयालममध्ये चित्रपट ‘लैला ओ लैला’ मध्ये लैलाची भूमिका तिने साकारली आहे. असेच छोटे छोटे रोल कायनात सध्या करत आहे. तिचा अभिनय उत्तम असूनही पाहिजे तसे काम सध्या तिला मिळत नाही.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *