Home / कलाकार / दिल्ली च्या मुलींना मराठी बद्दल काय वाटते पाहून गर्व वाटेल

दिल्ली च्या मुलींना मराठी बद्दल काय वाटते पाहून गर्व वाटेल

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेक जातीधर्माचे लोक राहातात आणि त्यानुसार त्यांच्या भाषा सुद्धा बदलतात. भारतात गुजराती, पंजाबी, हिंदी, मराठी आणि अशा अनेक भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येकाला आपली भाषा प्रिय असते. असाच एक विडिओ तुमच्यासाठी आज इथे घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला आपण मराठी असल्याचा गर्व आणि अभिमान वाटेल.

आपली मराठी इतर भागांत सुद्धा किती पसंत केली जाते हे तुम्हाला समजेल. हा व्हिडिओ भारताची राजधानी दिल्लीमध्ये शूट केला गेला आहे आणि तिथे बऱ्याच जणांना त्यांना मराठीबद्दल काय वाटते? मराठी भाषा त्यांना किती प्रिय आहे? असे अनेक प्रश्न विचारले गेले. त्यावर दिल्लीच्या जनतेने काय उत्तरे दिली हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि पुढे वाचत रहा.

काहींना मराठी हा शब्द म्हणलं की महाराष्ट्राची वेशभूषा म्हणजेच साडी, मुंबई, शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर, वडापाव आशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. एकाने तर सांगितले आहे की, महिला किंवा मुली साडीमध्ये डान्स करतात हे त्याला डोळ्यासमोर येते. झिंग झिंग झिंगाट, लावणी, गणेशोत्सव या मराठीतील प्रसिद्ध गोष्टी त्यांना आवडतात.

तसेच कपाळावर टीका, नेहमी उत्सुक, डोक्यावर टोपी, तसेच मराठी माणूस हा खूप कष्टाळू आणि हुशार आहे असे अनेक कौतुकाचे शब्द आणि अशी मराठी माणसाची ओळख या दिल्लीतील व्यक्तींनी सांगितली आहे. तुम्हाला आपल्या महाराष्ट्राची अशी कोणती गोष्ट आवडते? किंवा बाकी लोकांकडून तुम्ही मराठीबद्दल काय ऐकले ज्यामुळे मराठी असण्याचा तुम्हाला गर्व वाटला? मित्रांनो कमेंट करायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.