Breaking News
Home / कलाकार / दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेतल्या ज्योतिबा पहा

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेतल्या ज्योतिबा पहा

महेश कोठारी निर्मित ज्योतिबाचे माहात्म्य सांगणारी एक नवीन मालिका छोट्या पडद्यावर प्रसारित होत आहे. त्या नवीन मालिकेचे नाव ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ असे आहे. या संपूर्ण मालिकेत आपल्याला ज्योतिबा देवाबद्दल माहिती मिळणार आहे. इथे आपण आज या मालिकेत ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकम बद्दल माहिती घेणार आहोत.

विशाल हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर या तालुक्यातील देवखिंडी या गावचा आहे. त्याचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ ला झाला. त्याच्या वडिलांचे नाव बाळासाहेब यशवंत निकम आहे आणि ते शेतकरी आहेत. आई विजया निकम ही गृहिणी आहे. देवखिंडी या गावात विशाल लहानाचा मोठा झाला आणि सध्या विशाल पुण्यात राहतो.

शालेय शिक्षण देवखिंडीमध्येच तर पदवीचे शिक्षण विट्यातील बळवंत कॉलेजमध्ये पूर्ण केले. शिक्षणबरोबरच त्याने अभिनयाचे धडे घेतले आणि मुंबईला त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आला. मार्शल आर्टस्, डान्स, तलवारबाजी यांचेही त्याने प्रशिक्षण घेतले आहे. घरात अभिनय क्षेत्रात कोणी नसूनही त्याने जिद्द सोडली नाही आणि मेहनत करत राहिला.

त्याला अभिनय क्षेत्रात कसे पाऊल ठेवावे याची माहिती नव्हती म्हणून सुरुवातीला विशालने मुंबईतील एका जिममध्ये जिम ट्रेनर म्हणून नोकरी चालू केली आणि त्याच जिममध्ये कलाकार व्यायामासाठी येतात याचीही त्याला माहिती मिळाली होती. तो त्यावेळी कल्याण ते गोरेगाव असा रोज प्रवास करत असे. काही कलाकारांबरोबर ओळख झाल्यानं नंतर त्याने मॅगझीनसाठी फोटोशूट केले.

‘मिथुन’ या मराठी सिनेमाची त्याला संधी मिळाली. त्याच्या सिनेमातील अभिनयामुळे ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतही युवराजची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेतील युवराज म्हणजेच विशाल निकमवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. सध्या विशाल ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मध्ये ज्योतिबाची भूमिका साकारत आहे. तुम्हाला विशालचा हा प्रवास कसा वाटला कंमेन्ट मध्ये नक्की कळवा.

About admin

One comment

  1. Nutan Ghodake-Jadhav

    Khup mast, to Actor mhnun jasa prekshakanchya pasandila utarala ahe tasach ek manus mhanun suddha to khup changala ahe, majha to Classmate ahe.tyamul tyala mi personally olkhate. Tyala asech bharghos yash milat jave hich Sadichha..
    Proud of Wishal…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *