Home / आरोग्य / थंडीत मध्ये हि फळे खा आणि निरोगी रहा

थंडीत मध्ये हि फळे खा आणि निरोगी रहा

१) आवळा : आवळा हा व्हिटॅमिन सी ने युक्त असतो.ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते.रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याची मदत होते.आवळा पित्तशामक आहे.केसांसाठी, डोळ्यांसाठी आवळा हा फायदेशीर आहे.शरीराला टवटवीतपणा आणि तारुण्य देतो.प्रेगनेंट महिलांना उलटी आणि मळमळ होत, या वेळी त्यांना आवळा कँडी किंवा सुपारी दिली कि हा त्रास कमी होतो.नियमित आवळ्याच्या सेवनाने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढते. आवळा अनेकांना आवडतो देखील तसेच आवळा बाजारात लगेच भेटणारे फळ आहे.

२) ऊस : उसामुळे लघवीचे प्रमाण वाढते.हे ज्यांना मुतखडा झाला आहे त्यांना फायदेशीर आहे.शरीरातील सर्व विषाक्त पदार्थ धुतले जातात.ऊसामध्ये हा थंडपणा हा असतो.ऊस हा पित्तशामक आहे. ३) चिंच : पचनक्रिया वाढवणे आणि जेवणामध्ये रुची आणण्यासाठी चिंचेचा उपयोग होतो.दारूची नाश उतरवण्यासाठी पिकलेली चिंच कोमट पाण्यात भिजवून बारीक करावी आणि पाणी मिसळून त्यात थोडा गुळ विरघळूनप्यायला द्यावे. यामुळे हृदयाची जळजळ आणि दाहकता कमी होते.गळ्याला सूज आली असेन तर १० ग्राम चिंच घेऊन १ लिटर पाण्यात घालावी आणि त्यात थोडे गुलाबजल मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.शरीराचा एखादा भाग मुरगळला असेन तर चिंचेची ताजी पाने उकळून घेऊन त्या जागेला लावावे.४) बोर : बोर हे चवीला रुचकर आणि पचण्यास हलके असतात. वातदोष कमी करण्यात याचा उपयोग होतो आणि जुलाब थांबवते. या फळात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते. सीजन आल्यावरती बाजारात तुम्हाला अनेक ठिकाणी बोर दिसू लागतात त्यामुळे सहज तुम्ही ते विकत घेऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. भारतात अनेक फळांचे सीजन आहे आणि त्याच सिजनमध्ये ते फायद्याचे देखील असतात त्यामुळे हीच फळे नाही तर सिजन नुसार भेटणारी सर्व फळे तुम्ही नेहमी खात राहावीत. फळांमुळे आरोग्य चांगले राहते आणि रोग दूर होण्यास ते चांगले औषध देखील म्हणता येईल.

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.