भारतीय व्यक्ती या प्रत्येक गोष्टीत त्यांना आनंद कसा मिळेल, जुन्या वस्तूंचा जुगाड करून नवीन वस्तू कशा बनवाव्या तसेच आपल्या संस्कृतीला कसे जपले जाऊ शकते यांकडे खूप लक्ष देतात. भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वजणच आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतो. अश्याच व्यस्त जीवनामध्ये तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटेल असा एक एकदम मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे.
मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्टेशनवर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. हा एक फ्लॅश मॉब आहे जिथे अनेक मुलंमुली येऊन डान्स करतात. ‘रंग दे बसंती’ या गाण्यावर या फ्लॅश मॉबमध्ये डान्स केला जात आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. सुरुवातीला गाणे चालू झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की एक मुलगी नाचायला चालू करते. ती एवढ्या जोशमध्ये नाचत आहे आणि तिचा तो उत्साह बघण्यासारखा आहे. हळूहळू इकडून तिकडून तिचे सहकारी सुद्धा तिला साथ द्यायला येतात आणि सर्वजण ग्रुपमध्ये डान्स करू लागतात.
यांच्या डान्सने सर्व प्रवाशांना त्यांनी आकर्षित करून घेतले. सर्वजण तिथे डान्स बघण्यासाठी तसेच व्हिडिओ काढण्यासाठी इकडे तिकडे चढु सुद्धा लागले आहेत. मनातील सर्व विचार, टेन्शन विसरून लोक त्यांच्याकडे आनंदाने पाहत आहेत. काही प्रवाशांनी सुद्धा तिथे जाऊन डान्स करायला चालू केले. काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा नाचू लागले आहेत आणि त्यांच्याबरोबर बाकीच्यांनाही नाचायला बोलवत आहेत. हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि तुमच्याही मनाची मरगळ घालवा.
तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून एकदम ताजेतवाने वाटले का? तुम्हीही कधी असे फ्लॅश मॉब पाहिले आहेत का? आमच्याबरोबर शेअर करायला विसरू नकात. सोशल मीडिया हा मनोरंजनाच्या व्हिडिओमुळे खूप भरला आहे. तुम्ही जिथे जाणार तिकडे तुम्हाला वेळ घालवणारे अनेक व्हिडिओ बघायला मिळतील पण काही चांगले असतात तर काही नसतात.
दिवसभराच्या कामाला कंटाळून आपण जेव्हा मन फ्रेश करण्यासाठी सोशल मीडिया चालू करतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीने आनंद मिळावा असे वाटते, त्या गोष्टींमुळे आपल्याला हसायला यावे असेही वाटत असते जेणेकरून पुढचे काम उत्साहात करू. मित्रांनो, असाच काहीसा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन खूप फ्रेश होईल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेच त्याबरोबरच तुम्ही इतरांनाही हा व्हिडिओ बघ खूप हसू येईल असेही सांगाल. तुम्हाला एक म्हातारा आजोबा आणि म्हातारी आजी या व्हिडिओमध्ये नाचताना दिसतील.
‘पिंजरे मे पोपट बोले’ या गाण्यावर ते नाचत आहेत. आजी ही एकदम जोशमध्ये नाचत आहे. आजीचे वय कितीही झाले असले तरी ती त्याची फिकीर न करता बिनदास्त नाचत आहे. तो म्हातारा कदाचित दारू पिला आहे त्यामुळे तसं नाचत आहे. कुठल्यातरी रानात एका ठिकाणी व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून मजा घेतली का? तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
बघा व्हिडीओ: