आपल्या घरी किंवा आजूबाजूला अनेक कार्यक्रम होत असतात आणि तेही मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. लग्नकार्य असो वा कोणता सण जास्तकरून सगळीकडे डॉल्बी ही लावली जाते आणि डीजेच्या तालावर बरेच जण ठेका धरतात आणि त्या कार्यक्रमात रंगत आणतात. असाच एक करमणुकीचा व्हिडिओ आज इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन आनंदी होईल. हा व्हिडिओ एका लग्नसमारंभातील आहे आणि तुम्हाला माहितच आहे की, यावेळी आपल्या जवळपासचे सर्व नातलग मंडळी गोळा होतात.
अनेक मित्रमैत्रिणीही या कार्यक्रमात येऊन मजा आणतात. व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला काही मुलंमुली डान्स करताना दिसतील. जवळपास या स्टेजवर चार जोड्या डान्स करत आहे. सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने डान्स करत आहेत. व्हिडिओ शूटिंग मध्येही यांचा डान्स सगळीकडून घेतला आहे त्यामुळे व्हिडिओ पाहायला मजा येते. जर तुम्ही नंतर पाहिले तर जेव्हा त्यांची कुरिओग्राफर सर्वांना डान्स करायला बोलावते तेव्हा नवरा आणि नवरीसुद्धा येतात आणि सगळेजण मिळून डान्स करू लागतात.
त्यांच्यासाठी तो क्षण खूप आनंदाचा आहे. त्यांचा तो आनंद चेहऱ्यावर उठून दिसत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला? त्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लग्नसोहळा म्हणलं की सर्वचजण खूप उत्साहात असतात. लग्नांमध्ये दुसऱ्यांपेक्षा नवीन काय करायचे याकडे लक्ष लागले असते. मग यामध्ये घरातील बरेचजण सहभागी होतात आणि जर लहान मुलंमुली असतील तर तेही खूप आतुर असतात. यांच्यामुळेच कार्यक्रमाला खूप शोभा येते.
इथेही आज असाच विडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो जिथे तुम्ही पाहू शकता की दोन मुली डान्स करत आहेत. त्या एवढ्या काही मोठ्या नाहीत तरीही खूप छान नाचत आहेत. ‘कंमरिया आणि घर मोहें परदेशिया’ या गाण्यांना मिक्स करून हा डान्स त्यावर बसवला आहे. गाण्याला साजेसे असे त्यांनी कपडेही आणि मेकअप सुद्धा केला आहे.
लहानमुलांची हौस खुप वेगळीच असते. आजूबाजूला अनेक लोक जमलेले आहेत परंतु त्या दोघी न घाबरता बिनदास्त डान्स करत आहेत. आजकालच्या लहान मुलांना काही शिकवावे लागत नाही. तुम्हीही कधी अशा लग्नात गेले आहात का जिथे असे काही कार्यक्रम आयोजित केले होते आणि त्यामुळे त्या लग्नसोहळ्याला शोभा आली. आमच्या बरोबरही तुमचे ते आठवणीतील शेअर करायला विसरू नका.
बघा व्हिडीओ: