कोल्हापूर कबड्डी पठ्याने धरला डफड्या वर ठेका

कोल्हापूर म्हणल की तांबडा पांढरा रस्सा आला,कोल्हापूर म्हणलं की पैलवान लोकांची कुस्ती आली अन् याच कोल्हापूर मधील प्रसिद्ध वाद्य प्रकार म्हणजे डफडे. डफडे हलगी हे दोन वाद्य प्रकार कोल्हापूरमध्ये खूप रसिद्ध आहेत.या वाद्य प्रकारावर कोल्हापूरमधील सगळे लोक प्रेम करतात. लग्न समारंभ, देवाची मिरवणूक, जयंत्या किंवा कुस्त्यांचे मैदान या अशा कार्यक्रमासाठी या कोल्हापूर मध्ये सगळ्याचा वापर केला जातो.

या व्हिडिओ मध्ये ही असाच काहीसा प्रकार दाखवलेला आपल्याला दिसून येत आहे.या व्हिडिओ मध्ये हा कबड्डी खेळणारा मुलगा याच डफड्याच्या तालावरती ठेका धरताना दिसून येत आहे. या मुलाचा व्हिडिओ या आधी ही खूप वायरल झालेला होता पण हाच व्हिडिओ पुन्हा लोकांच्या समोर आलेला आपल्याला दिसून येत आहे. या वरून तुम्ही पाहू शकता की कोल्हापूरमध्ये डफडे किंवा हलगी हा प्रकार किती प्रसिद्ध आहे.

ज्याप्रकारे एका ठिकाणी हलगी प्रसिद्ध आहे. तशीच दुसऱ्या ठिकाणी दुसरे वाद्य आणि डान्स प्रकार देखील प्रसिद्ध असू शकतो. सोलापूर जिल्ह्यात हलगी वाद्य खूप गाजलेले आहे. खान्देशात पावरी हे संगीत खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील अनेक ठिकाणी फिरला असाल आणि तुम्ही तेथील वाद्य ऐकले असेल. आदिवासी लोकांचे तारपा वाद्य आणि त्यावर सुंदर डान्स देखील खूप गाजलेला आहे.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *