सध्या अनेक रिऍलिटी शोमुळे आपली करमणूक होते मग त्यामध्ये गायन, डान्स, कॉमेडी अश्या अनेक रिऍलिटी शोजचा समावेश आहे. याबरोबरच बऱ्याच ठिकाणी रोडशो सुद्धा केले जातात आणि त्यामध्ये अनेक प्रकारची नाटके आणि डान्स केला जातो. असाच एक कार्यक्रम परदेशात आयोजित केला गेला होता जिथे आपल्या भारतीय मुलींनी डान्स करून आपल्या देशाची मान उंच केली आहे. या कार्यक्रमात जो डान्स प्रकार केला गेला तो म्हणजे महाराष्ट्राचा प्रसिद्ध नृत्य प्रकार म्हणजेच लावणी.
या लावणीच्या तालावर आजवर बरेचजण नाचले आहेत. सुंदर असा साजेसा मराठमोळा लूक आणि लावणीच्या गाण्यातील तो ठसका हे या नृत्य प्रकारचे वैशिष्ट्य आहे. या व्हिडिओमध्येही अशीच उत्तम प्रकारे लावणी सादर केली आहे पण ती महाराष्ट्रातील जनतेसमोर नाही तर परदेशातील लोकांसमोर. खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्राचा एक नृत्य प्रकार हा परदेशात केला जातो. या व्हिडिओत लावणी सादर करणाऱ्या पाचही मुलींनी ती अगदी उत्तम प्रकारे निभावली आहे.
आपल्याला पोलीस म्हणले की कडक आणि रुबाबदार पोलीस समोर दिसतो. परंतु तेही आपल्यासारखीच माणसं आहेत. त्यांनाही त्यांचे कुटुंब आणि आपल्यासारखे जीवन जगण्याचा हक्क आहे. पोलिसांनाही मज्जा मस्ती करू वाटत असेल. परंतु त्यांचे कामच असे आहे की ते अशा सामान्य गोष्टी करताना आपल्याला जास्तकरून दिसत नाहीत. आज जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो पाहून तुम्हालाही आनंदच होईल. तुमच्या चेहऱ्यावर त्या व्हिडिओतील व्यक्तींना पाहून हसू येईल.
दिवसरात्र कष्ट करणारे पोलीस यांनाही खरंतर थोडासा ब्रेक हवा असतो. या व्हिडिओमध्ये काही भारतीय महिला डान्स करत आहेत. यांनी भारतीय महिलांप्रमाणेच साड्या घालून परदेशात रोडवर डान्स केला आहे. त्यांच्या या आनंदात चार-पाच पोलीस सुद्धा सामील झाले आणि त्यांना बरीच मजा आली हे आपल्याला व्हिडिओमधून दिसून येत आहे. लग्नसोहळा किंवा कोणताही कार्यक्रम असला की, आपण त्या कार्यक्रमात काय वेगळे करू शकतो याचा सर्वांना विचार पडतो.
आधी लग्नात फक्त हळदी आणि अक्षदा पडायच्या आणि लग्न संपन्न व्हायचे पण आता लग्नात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांची बरीच करमणूक होते आणि ते कार्यक्रमाचा आनंद घेतात. काही लग्नात नवरा आणि नवरी दोघेही एकमेकांसाठी डान्स करतात तर काहीजण बाहेरून डान्स करणारे बोलवतात. पण एवढे होत असतानाही लग्नात नवरा आणि नवरी किती मजा घेतात हेही महत्वाचे आहेत कारण शेवटी या लग्नसोहळ्याचे उत्सवमूर्ती हे तेच आहेत.
आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तिथे जावे आणि ते दृश्य पाहावे आणि जाऊन आपणही मजा घ्यावी असे वाटेल. या व्हिडिओत तुम्ही पाहाल तर अनेकजण बँडच्या तालावर नाचत आहेत. यामध्ये नवरीसुद्धा पूर्ण मजा घेत आहे. नवरीसुद्धा त्या सर्वांबरोबर डान्स करत आहे. ती दिसायलाही खूप सुंदर आहे आणि त्याप्रमाणेच तिचा डान्स सुद्धा सुंदर आहे.
तिच्या लग्नाचा ती पुरेपूर आनंद घेत आहे. तसेच या ठिकाणी बँडवाल्यांची सुद्धा करणमूक होत आहे. हे बँड पथक खूपच चांगले आहे कारण जर तुम्ही हे कसे वाजवतात ते पाहिले तर बघतच राहावे असे वाटेल. ते वाजवण्यामध्ये अत्यंत कुशल आहेत. काहीजण येऊन त्यांच्या वाजवण्याची कला आवडल्यामुळे त्यांना पैसेसुद्धा देत आहेत. व्हिडिओ बघणाऱ्याला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावा अस वाटेल. तुमचीही याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा.
बघा व्हिडीओ:
https://www.youtube.com/watch?v=Idy19WmWAMc&embeds_euri=https%3A%2F%2Fnews66daily.com%2F&feature=emb_logo