भाजप कार्यकारणीच्या बैठकीचे काल दिनांक २७ जुलै २०२० आयोजन केले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. कोणीही कोणावर चुकीचे स्टेटमेंट केले तर ते खपवून घ्यायचे नाही. कुणी चंपा म्हणतो, कुणी टरबूज्या म्हणतो हे खपवून घेतले जाणार नाही.
भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात एकमेकांवर टीका सोडणे, पलटवार करणे सुरूच असते, याच पार्श्वभमीवर त्यांनी हा सल्ला दिला. चंद्रकांत पाटील असेही म्हणाले की, २ दिवस मी काहीही स्टेटमेंट केलं की विरोधकांना ते सहन झाले नाही.
एका कार्यकर्त्याने कुत्रा म्हणणारी पोस्ट टाकली होती. मी त्याचा शोध घेऊन ती पोस्ट मागे घ्यायला सांगितली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन कमेंट केली तर ते खपवून घ्यायचे नाही, असे त्यांनी या बैठकीदरम्यान सांगितले.