कुठे हरवली ती चिमण्यांची चिव चिव चिमण्यांची आवड असेल तर नक्की पहा

चिमण्यांची चिव चिव म्हणलं कि लहानपणीचे दिवस आठवतात. पर्यावरण प्रेमींनी तर नक्कीच चिमण्यांना आपल्या अंगणात इकडे तिकडे भुर्र भुर्र उडताना पाहिले असेन, त्यांना दाणे टाकले असतील. किती सुखदायक वाटतात त्या आठवणी मनाला प्रसन्न करून जातात. उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांना पाणी पिण्यासाठी मडक ठेवणे, एका वाटीत तांदूळ किंवा काहीतरी खायला ठेवणे हा तर खूप जणांचा छंद असेन. चिमणी हा सगळीकडे आढळणारा सर्वसामान्य पक्षी आहे.चिमण्याचा थवा इकडे तिकडे उडताना दिसायचा आणि बाकीचे पक्षी हि, पण आता तुम्ही लक्ष दिलत कि आपल्याला आवडणाऱ्या या चिमण्या कुठेतरी हरवून चालल्या आहेत. आपण असतो हो आपल्या रोजच्या जीवनात मग्न त्यामुळे आता सध्या आपले या गोष्टींकडे लक्ष्यच नाही जात, म्हणून हा लेख खास त्यासाठी आहे.आज शहरांमधे आपल्याला खूप दुर्मिळ पणे चिमण्या पाहायला मिळतील. कावळे आणि कबुतर मोठ्या प्रमाणात असतात पण चिमण्या, मैना का कमी होत आहेत? आपण आपल्या खेडे गावात गेलो तर आपल्याला कुठे कुठे बघायला मिळतील, त्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळेल. कुठेतरी त्या पाण्यात खेळताना पण दिसतील, मन किती प्रसन्न होत या गोष्टी वाचतानाही मग प्रत्यक्षात अनुभवायला आपण त्यांची हि घट होण्यापासून वाचवलं पाहिजे. कुत्रा, मांजर अशा प्राण्याचे तर चिमण्या भक्ष्य असतात त्यामुळे कमी होतातच पण आज जे औद्योगिकीकरण वाढत चाललं आहे ते त्यांच्या आरोग्याला धोकादायक आहे. आता प्रदूषण इतकं वाढत चाललं आहे कि चिमण्या ते सहन नाही करू शकत आहे. हजारो वाहने रस्त्यांवरून रोज जात असतात, सिगारेट, फटाके, अशा बऱ्याच कारणामुळे प्रदूषण वाढत चालले आहे. प्रदूषणामुळे चिमण्याशिवाय बाकीच्या अजूनहि बऱ्याच गोष्टींना धोका पोहचत आहे.आपण हे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयन्त करायला हवे. जर असच प्रदूषण वाढत राहील तर चिमणी काय कोणतेच पक्षी इकडे तिकडे उडताना नाहीत दिसणार. त्यांच्या आवाजासाठी माणूस आतुर होईन पण ऐकायला नाही मिळणार. आज कोणाकडेच वेळ नसतो पण आपण वृक्षतोड कमी करून, कमी प्रमाणात गाड्या वापरून आणि अजून बऱ्याच पद्धतिने होणार प्रदूषण कमी करण्याचा प्रयाण करू शकतो. त्यामुळे आपलं पर्यांवरण तर वाचेनच आणि आपल्याही आरोग्याला धोका उत्पन्न होणार नाही आणि आपल्याला हवाहवासा वाटणारा चिमण्यांचा आवाजही अजून ऐकायला भेटेन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *