Breaking News
Home / कलाकार / का शेअर करत आहेत सर्व कलाकार हा फोटो, कोण आहे हि पहा

का शेअर करत आहेत सर्व कलाकार हा फोटो, कोण आहे हि पहा

शरीराचे वजन जास्त असले की, बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. ती व्यक्ती साधारण जीवन नाही जगत. कपडे, चालणे तसेच आरोग्याशी संबंधित आजार सुद्धा होतात. यांचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. महिलांचा हार्मोन्स असंतुलित असेल तर त्यांना अशा बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. जगातल्या सर्व महिला या स्वतःचे वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काहीजणी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आहार घेतात तर काहीजणी स्वतःचाच एक ठराविक आहार घेतात आणि वजन कमी करण्याच्या मागे लागतात.

काहीजणी यामध्ये यशस्वी होतात तर एवढे प्रयत्न करूनही माझे वजन कमी नाही झाले म्हणून प्रयत्न करायचे थांबवतात. पण स्वतःचे वजन कसेही असू, कसेही दिसू याचा काही जणींना फरक पडत नाही. ज्यांचे वजन जास्त असते त्या जास्त लोकांत जायला सुद्धा टाळतात तर काहीजणी अशा आहेत की त्यांना याचा काही फरक पडत नाही. त्या स्वतःचे वजन जास्त जरी असले तरी त्या समाजात खूप आनंदाने राहतात. अशाच एका अभिनेत्रीने स्वतःचे मत मांडले आहे. त्या अभिनेत्रीचे नाव वनिता खरात आहे.

या अभिनेत्रीने शाहिद कपूर यांच्याबरोबरही सुपरहिट चित्रपट कबीर सिंग मध्ये काम केले आहे. त्यात तिने शाहिदच्या घरी मोलकरणीची भूमिका साकारली होती. तिने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचा एक फोटो सध्या खूपच वायरल होत आहे. जवळपास सर्व अभिनेता अभिनेत्रींनी हा फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यांना वनिताचा अभिमान वाटतो हे सांगितले आहे.

स्वतः वनिता म्हणते की,’मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे … कारण मी मी आहे…!!! स्वतःच्या शरीरावर आपला गर्व असला पाहिजे त्याची आपल्याला लाज वाटू नये. आज बऱ्याचशा महिला अशा आहेत की, त्यांना आपल्या शरीराची खूप लाज वाटते आणि स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतात. सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, उर्मिला कोठारे अशा बऱ्याच जणांनी तो फोटो शेअर केला आहे.

हे फोटोशूट वनिता खरातने एका कॅलेंडरकरता केल्याचं दिसत आहे. कारण वनिताच्या फोटोसोबत नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचं कॅलेंडर असल्याचं कळतंय. वनिता खरातचं हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे. #BodyPositivity असा हॅशटॅग वापरत वनिताने हा फोटो शेअर केला आहे. स्वतःच्या शरीराचा आपल्याला गर्व आणि आत्मविश्वास असला पाहिजे.

पहा व्हिडीओ :

 

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *