Home / कलाकार / कारभारी लयभारी मधली अभिनेत्री पाहून पागल व्हाल

कारभारी लयभारी मधली अभिनेत्री पाहून पागल व्हाल

काही दिवसांपूर्वीच झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. समर आणि सुमी हे दोन पात्र त्या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. या मालिकेमध्ये प्रेम आणि राजकारण दाखवले गेले. या मालिकेने प्रेक्षकांची चांगलीच करमणूक केली होती. आता या मालिकेऐवजी नवीन मालिका झी मराठीवर येणार आहे.

त्या मालिकेचे नाव आहे ‘कारभारी लयभारी’. ‘कारभारी लयभारी’ मालिकेमध्ये सुद्धा राजकारण आणि प्रेम दाखवले आहे. ‘राजकारणाची झिंग आणि प्रेमाचा रंग’ असं या मालिकेच टायटल आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला होता आणि आता ही मालिका प्रदर्शित व्हायला चालू झाली आहे. ‘कारभारी लयभारी’ मालिका वाघोबा प्रोडक्शनची आहे.

या मालिकेमध्ये निखिल चव्हाण आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे. निखिल चव्हाण नाव ओळखीचे वाटत आहे का? हा बरोबर. निखिल चव्हाण हा ‘लागिर झालं जी’ या मालिकेमध्ये आज्याचा जवळचा मित्र होता. त्या मालिकेत निखिलने विक्रमची भूमिका साकारली होती जो एक फौजी होता. परंतु या मालिकेत तो जास्त काळ नव्हता.

‘वीरगती, स्त्रीलिंग पुल्लिंग’ या वेब सिरिज मध्ये सुद्धा निखिलने काम केले आहे. या वेबसिरीज मध्ये त्याने एक फनी पात्र साकारले होते जे दर्शकांना खूप आवडले. यानंतर तो आता ‘कारभारी लयभारी’ यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका राजकारणावर आधारित आहे आणि तो आपल्याला प्रोमोमध्ये एका हेलिकॉप्टरमध्ये दिसत आहे आणि असेही समजून येत आहे की त्याने कोणालातरी आधीच वचन दिले आहे की मी तुला भेटायला येतो.

हेच वचन पूर्ण करण्यासाठी तो गावाकडे हेलिकॉप्टरने येतो आणि नंतर गाडीने भेटायला जातो. परंतु नंतर त्याच्या लक्षात येते की पुढचा रस्ता खराब आहे त्यामुळे तो अक्षरशः घोड्यावरून तिला भेटायला जातो. ती मुलगी एका छोट्या गावातील आणि साधारण कुटुंबातील आहे हे दिसून येते. तीही त्याची आतुरतेने वाट बघते परंतु तिची मैत्रीण तिला बोलते की तो येणार नाही पण तिला पूर्ण विश्वास असतो की तो तिला भेटायला येणारच.

ह्या मुख्य भूमिकेत असणाऱ्या मुलीचे नाव अनुष्का सरकटे आहे. याआधी अनुष्का कलर्स मराठीवरील ‘लक्ष्मी नारायण’ या मालिकेमध्ये काम करत होती. यामध्ये तिने लक्ष्मीची भूमिका साकारली होती. ‘मी तुझीच रे’ या मालिकेमध्ये तिने दिव्याचे पात्र साकारले होते. आता ही ‘कारभारी लयभारी’ मालिकाही चालू झालेली आहे. ही मालिका पाहून तुम्हाला कशी वाटते कंमेन्ट मध्ये नक्की सांगा.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *