कारभारी दमानं लावणीवर ताईंचा सुंदर जलवा!”

“ढोलकीचे सुर कानावर पडताचं तामाशाच्या फडाकडे झेपावणारी मंडळी आजही टिकुन आहेतचं. नाचाच्या अनेक प्रकारांत लावणी मात्र सर्वश्रेष्ठचं! पठ्ठे बापुरावांनी हिला विशेष लोकवर्ग आणि समाजात आदराचे स्थान मिळवुन दिले. जुन्या काळात मनोरंनाची काही विशेष साधने ऊपलब्ध नसल्याने त्याकाळात तमाशा हाचं ऐकमैव मनोरंजन होते.

तमाशात लावणीचे स्थान प्रथम क्रमांकावर! मनोरंजन क्षेत्रात प्रगती झाल्यावर सुरवातीला तमाशाप्रधान चित्रपटांचीचं रेलचेल होती. ज्यात “पिंजरा” ते अलीकडच्या काळातील “नटरंग” आणी नुकतात आलेला व फेमस असा “चंद्रमुखी” हे विशैष गाजलेली नावे. तमाशा आणि तमासगिरीणीच्या नादी लागुन ऊध्वस्त झालेले व्यक्ती ह्या चित्रपटातुन दिसुन येतात. पण समाजजिवनावर ह्या तमाशा आणी लावणी कलेचा एक न मिटता येणारा प्रभाव हा शेवटापर्यंत राहिनचं!

मध्यंतरी को रो ना काळात लाॅकडाऊन आणि कडक निर्बंधात ह्या तमाशाफडांचे अतोनात हाल झाले. परंतु, ह्या महारोगराईचा प्रभाव संपताचं सुरु झालेल्या गावौगावच्या जत्रा,यात्रांनी तमाशा आणि लावणीफडाचे सुगीचे दिवस आणले व अमाप बिदागी मिळवत रस्त्यावर आलेले संसार सुरळीत झाले. एकेकाळी राजाश्रय मिळालेली आणि नावारुपाला आलेली ही लावणी लावण्यकलावती राष्र्टपती पुरस्कारविजेत्या स्व.विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर व पुढे सुरेखाबाई पुणैकर ते आताच्या काळातील मंगला बनसोडे व मंडळी ठसकेबाजपणे सादर करीत गाजवताहेतचं!

शृंगार, अध्यात्म, सामाजिक वास्तव याचे भान म्हणजे लावणी अलीकडे आपण लावणीमध्ये स्त्री-पुरुष संबंध तसेच शृंगाराच्या विविध गोष्टी लावणीमध्ये पाहतो. परंतु लावणी यापूरती मर्यादीत नाही पौराणिक, आध्यात्मिक आणि इतर अनेक विषयांवरही लावणीची रचना झालेली दिसते.यामधूनच कुठं कुठं जायाचं हनीमुनला, चला जेजुरीला जाऊ, पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची या दोन लावण्यांमध्ये अनुक्रमे श्रृंगार, अध्यात्म, सामाजिक वास्तव विषय हाताळले गेले आहेत.काही भेदिक लावण्यांमध्ये कोडी-उखाणेही आढळतात.

यामध्ये कलगी व तुरा हे दोन पक्ष असतात. रामजोशीने दुष्काळावर लावणी रचावी, वा अनंत फंदीने बदलत्या काळाविषयी खंत व्यक्त करावी, यावरून लावणीच्या विषयांचा आवाका किती मोठा आहे, ह्याची कल्पना येते.लावणीचे प्रकार -सर्वसाधारणतः ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज ही वाद्ये लावणीगायनात वापरली जातात. सादरीकरणाच्या दृष्टीने पाहता लावणीचे तीन प्रकार मानता येतील. शाहिरी लावणी, बैठकीची लावणी आणि फडाची लावणी हे ते तीन प्रकार होय.
१. शाहिरी लावणीमध्ये डफ-तुणतुण्याच्या साथीने गाणी गायली जातात. उच्च स्वराने साथ करणारे झीलकरी संचामध्ये असतात.
२. बैठकीची लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. तबला, पेटी, सारंगी, तंबुरी इत्यादी वाद्यांची साथ असते. नृत्य, गायन आणि दिलखेच अदा हे बैठकीच्या लावणीचे वैशिष्ट्य आहे.
३. फडाची लावणी हा सर्वज्ञात प्रकार आहे. उत्कृष्ट नृत्यांगणा, त्यांची अदा यासोबतीला नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांची साथ हे या लावणीचं वैशिष्ट्य. अश्याचं एका लावणीचा हा घायाळ करणारा गाजलेला व्हिडीओ आपण पाहूया.

बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *