सध्या स्टार प्रवाहवरील अतिशय प्रसिद्ध अशा मालिकेतील एका प्रसिद्ध पात्राबद्दल आपण माहिती घेणार आहोत. इथे आपण ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध आणि अरुंधती यांची मुलगी ईशा या पात्राबद्दल माहिती घेऊया. ईशाचे खरे आयुष्य तिचा जन्म कुठे झाला यांसारख्या बऱ्याच गोष्टींची माहिती इथे तुम्हाला आज भेटेल.
ईशाचे खरे नाव अभिनेत्री अपूर्वा गोरे हे आहे. तिचा जन्म २५ मार्चला धुळ्याला झाला. अपूर्वाचे संपूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण हे पुण्यातूनच पूर्ण झाले. सिंहगड कॉलेजमधून तिने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. अपूर्वाला लहानपणापासूनच अभिनयाची बरीच आवड आहे आणि तिने बऱ्याच नाटकांमध्येही काम केले आहे.
तिला बरीच पारितोषिके सुद्धा मिळाली आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेआधी सोनी मराठीवरील ‘ती फुलराणी’ या मालिकेत गुड्डीची भूमिका साकारली होती आणि खूप छान काम केले. तिला सतत एकच गोष्ट करत राहणे हे नाही आवडत, तिला नेहमी नवीन काहीतरी करावेसे वाटत असते. तिच्या मते तिचे आईबाबा जसे संवेदनशील आणि बोलके आहेत तशीच तीही आहे.
तिला तिच्या जीवनप्रवासात बऱ्याच वेगळ्या वेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत आणि अभिनयात एकदम कुशल बनायचे आहे. ती सुंदर गातेसुद्धा. जर तिला अभिनय क्षेत्रांत संधी नसती मिळाली तर ती इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये काम करणार होती. सध्या ती ‘आई कुठे के करते’ या मालिकेत ईशाची भूमिका साकारत आहे.
जी खूप अल्लड अशी मुलगी आहे. या मालिकेत तुम्हाला तिघा भावंडांची म्हणजेच अभिषेक, यश आणि ईशा यांची मज्जा मस्तीही पाहायला मिळेल. या मालिकेतही ती उत्तम भूमिका साकारत आहे. या अशा तरुण आणि नुकतंच पडद्यावर पाऊल ठेवलेल्या अभिनेत्रीला पुढेही चांगली प्रसिद्धी मिळो.