आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही,सोमवारी रात्री झोपताना करा या मंत्राचा जप !!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..मित्रांनो, प्रत्येकालाच जीवनात काही ना काही अडचणी येत असतात. प्रत्येक वारांचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते. त्यातीलच सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा वार आहे. या दिवशी अनेक लोक भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक टोटके, उपाय करीत असतात. मित्रांनो अनेक लोक सोमवारच्या दिवशी धार्मिक कामे तसेच दान देखील करतात. मित्रांनो प्रत्येक वाराचे आपले विशिष्ट असे महत्त्व असते. या दिवशी आपण काही उपाय केले त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो.

जर तुमच्याही जीवनामध्ये काही अडचणी, आर्थिक संकटे तसेच काही आरोग्यविषयक काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्ही सोमवारच्या दिवशी उपाय करू शकतात. तर मित्रांनो सोमवारच्या दिवशी घरातील माणसांमध्ये कलह होत असतील तर तुम्ही या दिवशी सव्वा किलो तांदूळ शिवलिंगावर अर्पण करावयाचे आहे. त्यामुळे घरातील कलह दूर होतात आणि आपले घर प्रसन्न राहते.

अनेक महिला आपल्या सौभाग्यासाठी देखील प्रार्थना करीत असतात. महिलांनी आपल्या सौभाग्यासाठीसाठी देवी पार्वतीला देखील सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायचे आहेत. या सौभाग्याच्या वस्तू म्हणजे जोडवी, बांगड्या, हळदी-कुंकू अशा प्रकारच्या जर वस्तू तुम्ही अर्पण केल्या तर तुमचे सौभाग्य चांगले राहील.

आणि देवीला प्रार्थना पूर्वक नमस्कार करून माझे सौभाग्य अखंड राहू दे. त्याला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे. अशी प्रार्थना करावयाची आहे. जर तुम्हाला नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील, काही अडथळे येत असतील तर शिवलिंगावर बेलाचे पान, रुद्राक्ष, दूध या पैकी तुम्हाला ज्या वस्तू शक्य आहेत त्या शिवलिंगावर अर्पण केल्याने नोकरीतील सर्व अडथळे, अडचणी दूर होऊन तुम्हाला नोकरीमध्ये यश प्राप्त होईल.

या वस्तू अर्पण करण्याच्या अगोदर तुम्हाला तांब्याचा कलशामधील जल शिवलिंगा वरती शिंपडायचे आहे आणि मगच या वस्तू अर्पण करायचे आहेत. जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, तुम्हाला पैशाची चणचण कायम असेल तर सोमवारच्या दिवशी तुम्ही या मंत्राचा जप केला तर तुम्हाला पैसा कधीच कमी पडणार नाही. हा मंत्र जप करण्या अगोदर तुम्हाला शिवलिंगास समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम साम सदाशिव या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला जेव्हा वेळ शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे. कमीत कमी एकवीस वेळा तरी या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. या मंत्राचा जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ वापरायची आहे.

हा मंत्र जर पती-पत्नी दोघांनी मिळून एकत्र केला तर याचा शुभ आणि त्वरित फळ आपल्याला मिळेल. पैशाची चणचण तुमच्या आयुष्यात कधीच भासणार नाही. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही एकटे बसून देखील या मंत्राचा जप करू शकता. हा खूपच प्रभावशाली व चमत्कारी मंत्र आहे.

तर मित्रांनो, तुमच्याही जीवनात तुम्हाला पैशाची चणचण भासत असेल. कशामध्ये हे यश प्राप्त होत नसेल तर या मंत्राचा जप तुम्ही सोमवारच्या दिवशी अवश्य करा. त्यामुळे तुमच्या जीवनात कधीच पैसा कमी पडणार नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *