Home / कलाकार / आदिवासी मुलींनी केला समुद्रकिनारी मनमोहक डान्स

आदिवासी मुलींनी केला समुद्रकिनारी मनमोहक डान्स

इथे आज तुमच्यासाठी तुमच्या बऱ्याच आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तुम्हाला आठवत असेल वर्षातून एकदा शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असायचा जिथे आपण बराच सराव करून स्टेजवर डान्स करायचो. तुम्ही शाळेत असताना आशा काही गोष्टींचा अनुभव नक्कीच घेतला असेल.

आपल्या देशात अजूनही सर्वचजण सुशिक्षित नाहीत. आदिवासी वर्ग हा आधी बराच मागासवर्गीय असा समजला जायचा पण आता आपल्या देशातील बऱ्याच भागांत खूप बदल होत आहेत. आदिवासी समाजातील मुलेच नाहीतर मुलीसुद्धा आज शाळेत जाताना दिसत आहेत. मुलीसुद्धा आज मुलांप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहेत.

या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहाल तर या मुली ग्रुप डान्स करताना दिसत आहेत. यांना कदाचित शाळेमध्ये डान्स सरावासाठी जागा नसल्यामुळे ते समुद्र किनारी सराव करत आहेत. जिथे आवड असते तिथे आपण बरोबर मार्ग काढतो हे इथे बरोबर शोभते. या मुलिंना शाळेच्या ड्रेसमध्ये आणि दोन वेन्यांमध्ये बघताना पुन्हा एकदा शाळेत जावे असे वाटते.

या मुलींबरोबर त्यांचे शिक्षक सुद्धा आपल्याला दिसत आहेत. त्यांचा डान्स चांगला व्हावा यासाठी ते त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला का? आमच्याबरोबर त्या आठवणी कमेंटद्वारे शेअर करायला विसरू नका. तुमच्या लाईक आणि शेअरमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते.

पहा व्हिडीओ:

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published.