Home / कलाकार / आई माझी काळूबाई मालिकेत दिसणार हि हिरोईन

आई माझी काळूबाई मालिकेत दिसणार हि हिरोईन

सोनी मराठीवर ‘आई माझी काळुबाई’ या मालिका बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे ही मालिकेने वेगळे वळण घेतले आहे. या मालिकेच्या गाण्याच्या शूटिंगवेळी सुद्धा बरेच प्रसंग झाले ज्यामुळे ही मालिका चर्चेत आली. आई काळुबाईच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री अलका कबुल दिसून येत आहेत तर आर्याच्या भूमिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आहे.

पण एका वेबसाईटवर जी बातमी दिली गेली त्यामुळे ही मालिका पुन्हा चर्चेत आली. ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतून प्राजक्ताला बाहेर जावे लागणार अशी ती बातमी होती. काही वादामुळे आणि वेळेच्या गोष्टीवरून प्राजक्ता या मालिकेमध्ये काम करायची थांबली आहे. निर्मिती संस्था आणि प्राजक्ता यांच्यातला वाद अतिशय टोकाला गेला ज्यामुळे हा बदल या मालिकेत होणार आहे.

प्राजक्ताच्या जागी आता नवीन अभिनेत्री येणार आहे. या नवीन अभिनेत्रीचे नाव काय असेल हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप ही आर्याची भूमिका निभावणार आहे. वीणाने मराठी बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. बिगबॉस मध्ये असताना वीणाची आणि शिव ठाकरेची जोडी दर्शकांच्या खूप पसंतीस आली.

ते दोघे आत्ताही त्यांच्या दोघांचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकत असतात आणि त्यांना बरेच लाईक्सही मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊया वीणाबद्दल थोडीशी माहिती. वीणाचा जन्म ४ मार्च १९९४ ला मुंबईच्या उल्हासनगरमध्ये झाला. तिचे शालेय शिक्षण गुरुनानक हायस्कूल उल्हासनगर येथूनच झाले. तिने बँकिंग आणि इन्शुरन्स मधून पदवी घेतली आहे.

लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड आहे आणि तिने बऱ्याच अभिनय स्पर्धेत सहभागही घेतला आहे. तिने नंतर ऑडिशन्स द्यायला चालू केली आणि नंतर तिला ‘सतरंगी ससुराल’ या मालिकेत कामाची संधी मिळाली. स्टार प्लस वरील ‘ये रिशता क्या कहलाता है’ मध्ये काम केले. तिला खरी ओळख ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेमुळे मिळाली. ‘आनंद आणि व्हाट्सएप लग्न’ या चित्रपटात काम केले आहे. तर प्रेक्षकहो तुम्हाला आता प्राजक्ताऐवजी वीणा ही आर्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *