Breaking News
Home / कलाकार / आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध ची पत्नी पाहून वेडे व्हाल

आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध ची पत्नी पाहून वेडे व्हाल

सध्या स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका खूप प्रसिद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वी अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. नंतर काही दिवसांनी अनिरुध्द आणि संजना यांचे प्रेमप्रकरण घरी काही जणांना समजले. घरात त्यांच्या दोघांच्या मुलांनाही ते समजले.

अनिरुद्धने अभिषेकला काहीतरी सांगून समजवण्याचा प्रयत्न केला की त्याच्यात आणि संजनामध्ये काही चालू नाहीये, उलट संजनाच त्याच्या मागे लग्न कर म्हणून लागली आहे. परंतु जेव्हा लग्नाच्या विधींच्या वेळी अरुंधतीने ते दोघे एकमेकांच्या जवळ असताना पाहिले आणि जे काही प्रेमात ते बोलले, ते तिने ऐकले आणि ती बेशुद्ध झाली. अनिरुद्धने तरीही अभिषेकला खोटे सांगून त्याला सांभाळून घेतले.

पण अरुंधतीने जे काही पाहिलं आणि ऐकलं ते कोणालाही माहीत नाही. त्यामुळे आता अरुंधती पुढे काय करते, अनिरुद्ध बरोबर ती कशी वागते आणि संजनाला ती कशी आणि काय बोलेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. आपण रोज आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची अरुंधती ही बायको आहे, त्याची तीन मुलं आहेत आणि एक संजना आहे जिच्यावर त्याचे प्रेम असते हे सगळं पाहतो.

पण आज आपण त्याच्या खऱ्या आयुष्यातील बायको आणि मुलांबद्दल माहिती घेणार आहोत. अनिरुद्धचे खरे नाव मिलिंद गवळी आहे जो आज आई कुठे काय करते या मालिकेमुळे खूप प्रसिद्ध झाला आहे. अभिनेता मिलिंद गवळी हे एकदा बहिणीच्या सासरी म्हणजेच जळगावला गेले होते. त्याच स्टेशनवर मिलिंदला एक मुलगी दिसली आणि तिला पाहताक्षणीच पहिल्या नजरेतच मिलिंदला ती खूप भावली.

त्यानंतर मिलिंद त्यांच्या बहिणीच्या घरी गेले आणि काही दिवसांनी तीच मुलगी एक लग्न कार्यक्रमात त्यांना दिसली. मिलिंदने नंतर त्या मुलीची माहिती काढली तर समजले की ती मुलगी आपल्याच नातेसंबंधातली आहे. त्या मुलीचे नाव आहे दीपा. मिलिंदने ही गोष्ट घरीही सांगितली की त्यांना दीपा खूप आवडते आणि नंतर घरात लग्नाची बोलनीही सुरू झाली.

परंतु मुलीच्या घरच्यांची अशी अपेक्षा होती की मुलगा हा सरकारी नोकरी करणाराच पाहिजे. आता प्रेमापुढे कोणाचे काही चालत नाही. मिलिंदने नंतर अभिनय सोडला आली एमपीएससीच्या परीक्षेची तयारी चालू केली. मिलिंद ही परीक्षा पास होऊन सरकारी नोकरीही करू लागले. त्यानंतर दीपा आणि मिलिंदचे लग्न झाले. दीपा आणि मिलिंदला एक मुलगी आहे जिचे नाव मिथिला गवळी. तीही आता मोठी झाली आहे आणि तिचे २०१८ मध्ये लग्नही झाले आहे. ही आहे मिलिंदची खऱ्या आयुष्यातील प्रेम कहाणी.

About admin

2 comments

 1. I am Milind Gawali’s daughter Mithila. The information in the article is mostly incorrect. Also that picture is of my father and me. Really appreciate the efforts for the article but please get the facts correct. Thank you. God bless.

  • Thanks for clarifying it for fans like us. They should verify before publishing articles like this. Also they should be sensitive with the headlines of articles.
   Although dad is handsome and daughter is pretty.

   Nevertheless, I just came to know that Mr. Gawali is the same person who I grew up watching in Campus serial. He was truly amazing in Campus and speaks through his eyes. It will be a great contribution if he acts in Hindi as well as South Indian cinema. His type of personality is very much required in today’s film world.

   Convey my regards to Mr. Milind.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *