Breaking News
Home / कलाकार / आई कुठे काय करते मधल्या यश ची खरी बायको पहा

आई कुठे काय करते मधल्या यश ची खरी बायको पहा

‘आई कुठे काय करते’ ही सध्या स्टार प्रवाह वरील मालिका खूप प्रसिद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वी अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पण आपण सगळ्यांनीच पाहिले की त्यावेळी संजना, अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्यात काय घडले. नंतर काही दिवसांनी अनिरुध्द आणि संजना यांचे प्रेमप्रकरण घरी सगळ्यांना समजले.

अरुंधतीची तिन्ही मुलं तिच्या बाजूने आहेत. त्यातला एक आहे यश. यश हा आईचा लाडका मुलगा आहे. यशची भूमिका दर्शकांनाही खूप पसंतीस पडत आहे. यशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे अभिनेता अभिषेक देशमुख. मालिकेमध्ये यशला गौरी ही पसंत असते. परंतु सध्या मालिकेमध्ये जे वादविवाद चालले ते तुम्ही पाहिलेच असतील.

त्यामुळे गौरी आता यशला बोलत नाही आणि ती तिथे राहतही नाही. परंतु त्याच्या खऱ्या आयुष्यात यश कोणावर प्रेम करतो आणि कोण आहे ती नशीबवान मुलगी हे आपण आज पाहणार आहोत. अभिनेता अभिषेक देशमुखचे लग्न सुप्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देव हिच्याबरोबर ६ जानेवारी २०१८ रोजी झाले आहे. त्यांच्या लग्नाला आता दोन पेक्षा जास्त वर्षे पूर्ण झाली आहेत.

अभिषेक आणि कृतिका यांचा प्रेमविवाह झाला आहे. दोघांचे लग्न काही मोजक्याच मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडले होते. अभिनेत्री कृतिका ही मुळची पुण्याची आहे. तिने शालेय शिक्षण एसपी कॉलेजमधून केले आहे. प्राईम टाइम या मालिकेत तिने काव्या आपटेची भूमिका साकारली आहे.

नंतर तिने राजवाडे आणि सन्स, हॅपी जरनी, हवाईजादा, बकेट लिस्ट, पानिपत यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. अभिषेक देखील एक अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याने पसंत आहे मुलगी या मालिकेत काम केले आहे. आत्ता तो आई कुठे काय करते या मालिकेत आईचा लाडका मुलगा यशची भूमिका निभावत आहे.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *