Breaking News
Home / कलाकार / आई कुठे काय करते मधल्या गौरी ला पाहून होश उडतील

आई कुठे काय करते मधल्या गौरी ला पाहून होश उडतील

प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी बऱ्याच मालिका येतात आणि या नवीन मालिकांबरोबर आपल्या भेटीस येतात ते म्हणजे नवीन चेहरे. आज अशाच एका नवीन चेहऱ्याबद्दल येथे जाणून घेणार आहोत. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता दर्शकांच्या जास्तच पसंतीस उतरली आहे. या मालिकेत दिवसेंदिवस वेगळी वळण येत आहेत.

आता अरुंधती, अनिरुध्द आणि संजना या तिघांमध्ये काय होते याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. पण याबरोबरच दुसरीकडे यश म्हणजेच अरुंधतीचा मुलगा आणि गौरी या दोघांचे प्रेम बहरत आहे. आपण याच गौरीबद्दल आज येथे माहिती घेणार आहोत. गौरी ही प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तिचा जन्म २३ सप्टेंबर ला महाराष्ट्रातील बीड येथे झाला.

तिचे सर्व शिक्षणही तेथूनच पूर्ण झाले आहे. ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत असते. तिला अभिनयाबरोबरच गायनाचीही आवड आहे. तुम्हाला तिचे बरेच व्हिडीओ तिच्या अकाऊंटवर पाहायला मिळतील. ‘चातकवेना’ हे गौरीचे पहिले नाटक आहे.

तिची टीव्हीवरील ‘आई कुठे काय करते’ ही पहिलीच मालिका आहे. पहिली मालिका असूनही गौरीने अतिशय कष्टाने अभिनय केला आहे आणि तिला तिच्या या कष्टाचे फळ आता मिळत आहे. तुम्हालाही ही गौरी कशी वाटते नक्की सांगा.

About k3dpf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *