चित्रपटांमुळे आपले खूप मनोरंजन होते आणि त्यापेक्षाही जास्त त्यातील गाण्यांमुळे होते. चित्रपट पाहिला तर आपण एखादेवेळी त्याची स्टोरी विसरतो पण गाणे नेहमी गुनगुनत राहतो. काही गाणे आपल्याला रडवतात भावुक करतात तर काही आपल्यामध्ये उत्साह निर्माण करतात. भारतामध्ये बरेच गायक आणि गायिका आहेत जे त्यांनी गायलेल्या गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच एका गायकाबद्दल आपण येथे बोलणार आहोत. सुप्रसिद्ध गायकांपैकी एक म्हणजे ए आर रहमान आहेत.
त्यांनी गायलेली गाणी आपण बऱ्याचदा ऐकली आहेत आणि पुन्हा पुन्हा ऐकण्याची आपली नेहमी इच्छा होते. त्यांचे खरे नाव दिलीप कुमार आहे. त्यांचे वडीलसुद्धा एक संगीतकार होते. त्यांनी मल्याळम सिनेसृष्टीत संगीतकार म्हणून काम केले आहे. दिलीप यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांपासून संगीताचे धडे घ्यायला चालू केले. परंतु नशिबात काही वेगळेच होते. दिलीप ९ वर्षांचे असतानाच त्यांचे निधन झाले. घराला आर्थिक मदत म्हणून दिलीप यांनी काम करायला चालू केले. त्यांनी संगीत संबंधित व्यक्तींना मदत करायला चालू केले.
संगीत वादनेही त्यांनी दुरुस्त करून दिली आहेत. अशातच त्यांचे शिक्षणापासून अंतर वाढू लागले. आता सिनेसृष्टीत प्रत्येकजण त्यांच्याकडून गाणे गाऊन घेण्यासाठी विचारत असतो. काही दिवसांनी संत पिरमुल्ला शाह यांच्यापासून प्रेरीत होऊन त्यांनी मुस्लिम धर्म स्विकारला आणि दिलीप कुमार हे ए आर रहमान झाले. १९९२ मध्ये आलेल्या ‘रोजा’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यानंदा संगीत दिले तेव्हापासून ते प्रसिद्ध झाले. २००९ मध्ये ‘स्लमडॉग मिलेनिअर’ पासून त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलले. या चित्रपटासाठी रहमान यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला.
परंतु त्यांना संगीताबरोबर अजून काही वेगळे करण्याची इच्छा होती त्यामुळे ते अमेरिकाच्या लॉस एंजलिसमध्ये गेले. तिकडे त्यांनी प्रसिद्ध संगीतकारांबरोबर काम केले परंतु मनातून त्यांना भारतासाठीच आपण काम करावे असे वाटू लागले. त्यांची आईची तब्येत सुद्धा नीट नव्हती तसेच त्यांची मुले मोठी होऊ लागली होती. त्यामुळे २०१५ मध्ये ते भारतात परत आले. मायभूमीवर परतल्यानंतर त्यांनी वायएम नावाचे म्युजिक स्टुडिओ चालू केले.
९९ एकर असलेल्या या ठिकाणी त्यांनी चित्रपट करणेसुद्धा चालू केले. ’99 सॉंग्स आणि ली मास्क’ यांसारखी कामे करायला चालू केले. रहमान हे याचे दिग्दर्शक आहेत. ‘ली मास्क’ या चित्रपटात तुम्हाला बऱ्याच नव्या गोष्टी पाहायला मिळतील, जसं की ३६० डिग्री चे नजारे, रोबोटिक्स. रहमान यांचा एकच उद्देश आहे की नकाशात भारत हा संगीत क्षेत्रात नेहमी उच्च स्थानी असावा आणि भारत नेहमी चमकत राहावा.