Breaking News
Home / कलाकार / अभिजित राजेंची मुलगी पाहून वेडे व्हाल

अभिजित राजेंची मुलगी पाहून वेडे व्हाल

मराठी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार प्रसिध्द आहेत. त्यांपैकीच आपण आज बोलणार आहोत गिरीश ओक यांच्याबद्दल. गिरीश ओक हे खूप दशकांपासून मराठी सिनेसृष्टीत काम करत आहेत. बऱ्याच चांगल्या चित्रपटात आणि मालिकांमध्ये गिरीश यांनी काम केले आहे. गिरीश ओक हे एक डॉक्टर आहेत. गिरीश यांचा अभिनयही अतिशय उत्तम आहे.

सध्या सुरू असलेली आग्गबाई सासूबाई या मालिकेत गिरीश ओक हे शेफ अभितीज राजेची भूमिका साकारत आहेत. या मालिकेलाही प्रेक्षकांनी खूप पसंत केले आहे. तर आज आपण आग्गबाई सासूबाई मध्ये शेफ अभिजीत राजेची भूमिका करणाऱ्या गिरीश ओक यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. गिरीश ओक यांचा जन्म महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला असून ते लहानाचे मोठेही नागपूर मध्येच झाले.

त्यांचे शालेय शिक्षण पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल मधून झाले. महाविद्यालयीन शिक्षण गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजमधून पूर्ण झाले आहे. गिरीश ओक हे पेशाने डॉक्टर आहेत पण त्यांना त्याबरोबरच अभिनयाची खूप आवड होती त्यामुळे त्यांनी नंतर अभिनयही करायचं ठरवलं. सिनेसृष्टीत आता एकापेक्षा जास्त लग्न करणे हे नवीन नाहीये. गिरीश ओक यांची दोन लग्ने झाली आहेत.

पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक असून त्यांना एक मुलगीही आहे जिचे नाव अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले. गिरीजाही एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिचेही बरेच चित्रपट आणि मालिका आहेत. गिरीजाचे लग्न सुरत गोडबोले यांच्याबरोबर झाले आहे. सुरत हे देखील कलाकार क्षेत्रांतच कार्यरत आहेत.

गिरीश ओक यांचे दुसरे लग्न २३ मार्च २००८ ला पल्लवी ओक यांच्याबरोबर झाले आहे. त्यांना एक दुर्गा नावाची एक लहान मुलगीही आहे. सध्या ते ठाण्यात राहत असून आग्गबाई सासूबाई या मालिकेची शूटिंगही ठाण्यातच चालू आहे. अशी आहे गिरीश ओक यांच्या आयुष्याची थोडक्यात आणि मोजक्या शब्दातील कहाणी.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *