Home / कलाकार / अनिल कपूर ची पत्नी आहे हि प्रसिद्ध हिरोईन

अनिल कपूर ची पत्नी आहे हि प्रसिद्ध हिरोईन

सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनीता कपूर या दोघांचे प्रेम प्रकरण बऱ्याच लोकांना माहिती असेल. सुनीताने एका चांगल्या पत्नी बरोबरच अनिल कपूरला नेहमी साथ दिली आहे. पण ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे अनिल आपल्या पत्नीला बॉलीवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षितच्या नावाने हाक मारायचे.

बघायला गेलो तर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितने ८०- ९० दशकात खूप चित्रपटात एकत्र काम केले आहे आणि चित्रपट सुपरहिट झाले आहेत. त्यांच्या या जोडीला खूप पसंत केले जायचे. त्यावेळी माधुरी सिंगल होती पण अनिल कपूरचे लग्न झाले होते. खूप चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यामुळे अनिलच्या डोक्यावर माधुरीच्या नावाचा परिणाम झाला होता.

एवढंच नाही तर माधुरीच्या नावाचा एवढा परिणाम झाली की घरी जाऊन त्याच्या बायकोला सुद्धा ते माधुरी या नावाने हाक मारायचा. अनिल कपूर नुकतंच सलमानच्या १० का दम या शोमध्ये रेस-३ चे प्रोमोशन करण्यासाठी गेले होते. तिकडे गेल्यावर सलमानने एक प्रश्न पण विचारला होता की किती टक्के भारतातले लोक

आपल्या पत्नीला कुणा दुसऱ्याच्या नावाने हाक मारतात. या प्रश्नाचे उत्तर देताना अनिलने सांगितले की, ते त्यांच्या पत्नीला माधुरीच्या नावाने हाक मारायचे. त्यांनी सांगितले की , त्यांनी खूप चित्रपटात माधुरीबरोबर काम केले आहे त्यामुळे तिचे नाव सारखे तोंडावर येत असे. त्यांनी हेही सांगितले की त्यांची पत्नी कधीही त्यांना या कारणावरून भांडली नाही कारण तिला माझ्या व्यवसायाबद्दल सगळी माहिती आहे.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published.